नवी दिल्ली : ज्या उमेदवारांनी कोरोना साथीच्या काळात केंद्रीय नागरी सेवा आयोगाची [ UPSC ] परीक्षा दिल्या आहेत़ तसेच, ज्यांच्या प्रयत्नांची संख्या संपली आहे, अशा इच्छुक उमेदवारांना आणखी एक संधी मिळणार असल्याची माहिती आहे.
ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी आवश्यक असलेली वयोमर्यादा ओलांडली आहे, अशांना ही सुविधा लागू होणार नाही, असे देखील सरकारच्या वतीने न्यायालयात [ SUPREME COURT ] स्पष्ट करण्यात आले आहे. आकडेवारीनुसार, ३ हजार ८६३ उमेदवारांची परीक्षा देण्याची संधी संख्या संपली असून, २ हजार २३६ उमेदवार वयोमर्यादेमुळे बाद झाले आहेत.