Home राष्ट्रीय न्यायव्यवस्थेला सुदृढ बनवणे, जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मिळून काम व्हावे

न्यायव्यवस्थेला सुदृढ बनवणे, जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मिळून काम व्हावे

57

नवी दिल्ली : न्यायव्यवस्थेला सुदृढ बनवण्यासाठी आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायव्यवस्था आणि सरकारने मिळून काम करावे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी [ pm modi ] यांनी व्यक्त केले.

गुजरात उच्च न्यायालयाच्या [ gujrat high court ] रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ते बोलत होते.

नागरिकांच्या अधिकारांची सुरक्षा असो वा राष्ट्रीय हिताला प्राधान्य असो, न्यायव्यवस्थेने नेहमी कर्तव्य बजावले आहे. न्यायव्यवस्थेत केल्या जाणाºया विविध सुधारणांमुळे न्यायालयांचे कामकाजही आधुनिक झाले आहे. कोविड काळात सर्वोच्च न्यायालय, तसेच जिल्हा न्यायालयांमध्ये मोठ्या प्रमाणात डिजिटल माध्यमातून सुनावणी झाल्याचेही मोदी यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here