Home उपराजधानी नागपूर काटोल पालिकेतील नगर रचनाकार अधिकाºयांना एक लाखाची लाच घेताना पकडले

काटोल पालिकेतील नगर रचनाकार अधिकाºयांना एक लाखाची लाच घेताना पकडले

358

काटोल (नागपूर) : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने स्थानिक नगर पालिकातील सहाय्यक नगर रचनाकार दिनेश विजय गायकवाड आणि विपिन विजय भांदककर रचना सहाय्यक यांना सुमारे एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

यातील तक्रारदार हे लहानराम मंदिराजवळ काटोल (जि. नागपूर) येथील रहिवासी असून, मित्रासोबत प्लॉट ले-आऊट विक्रीचा व्यवसाय करतात. मौजा काटोल येथील 671/2 मधील प्लॉट क्र. 35 हे नगर परिषद काटोलकडे विकास कामाच्या बदल्यात सन 2008 पासून गहाण ठेवला होता. सदर ले-आऊटमध्ये पूर्ण विकासकामे झाल्याने तक्रारदाराने मुख्याधिकारी नगर परिषद काटोल येथे मौजा काटोल येथील 671/2 मधील प्लॉट क्र. 35 हा भूखंड मोकळा करण्यासाठी रितसर अर्ज केला होता. सदर अर्जावर काय कारवाई केली याबाबत तक्रारदारांनी गायकवाड व भांदककर यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदारास अर्जातील त्रुटीचे कारणे दाखवून नगर परिषदेकडून भूखंड सोडविण्याचे ना हरकत प्रमाणपत्र देण्याकरिता 2,50,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र, अशी कोणतीही इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ( anti corruption nagpur ) तक्रार नोंदवली.

पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांनी तक्रारीची अत्यंत गोपनियरित्या शहनिशा करून सापळा रचला. यानंतरच्या प्रक्रियांत तडजोड करून ही रक्कम एक लाखावर आणली आणि दोन्ही अधिकाºयांना रंगेहात पकडले. यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार, अपर पोलिस मिलींद तोतरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, पोलिस निरीक्षक विनोद आडे, नापोशि लक्ष्मण परतेती, भागवत वानखेडे, सुशील यादव, मनापोशि शालिनी जांभुळकर, चालक सारिक अहमद यांनी सहभाग घेतला.