Home राष्ट्रीय उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, सर्वत्र पाणीच पाणी

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, सर्वत्र पाणीच पाणी

52

चमोली (उत्तराखंड) : जोशीमठच्या रेणीतील ऋषीगंगा प्रकल्पाजवळ हिमकडा अर्थात ग्लेशियर कोसळला असून, पाण्याची पातळी वाढल्याने तपोवनमध्ये वीज प्रकल्प वाहून गेल्याची माहिती आहे. यात अनेकजण वाहून गेल्याची भीती वर्तवली जात आहे. प्रशासनाने तत्काळ मदत व बचावकार्य सुरू केले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, तपोवन परिसरातील रेणी गावात वीज प्रकल्पाजवळ अचानक झालेल्या हिमस्खलनानंतर धौलीगंगा नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे परिसरात पाणीच पाणी पसरले असून, काहीजण बेपत्ता झाल्याची माहिती आहे. एबीपी माझाने यासंबंधी वृत्त दिले आहे.

तर एएनआयनुसार, आयटीपी, राज्य आणि केंद्रीय आपत्ती निवारण दल वेगवेगळ्या ठिकाणीहून रवाना होत आहेत. (प्राथमिक वृत्त)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here