Home राष्ट्रीय नैसर्गिक आपत्तीत 10 जणांचा मृत्यू, 150 जण बेपत्ता

नैसर्गिक आपत्तीत 10 जणांचा मृत्यू, 150 जण बेपत्ता

96

डेहराडून : उत्तराखंडमध्ये चमोली जिल्ह्यात हिमकडा तुटल्यामुळे आलेल्या आपत्तीमध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, तब्बल 150 जण बेपत्ता असल्याचेही सांगण्यात येत आहे.

रविवारी सकाळी आलेल्या आपत्तीनंतर प्रशासनाकडून थेट श्रीनगर ते हरिद्वारपर्यंत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, राज्य सरकारने मृतकाच्या वारसांना चार लाख रुपयांची मदत घोषित केली आहे.

संक्षिप्त
* उत्तराखंडमध्ये हिमनग तुटल्याने धौलीगंगा नदीला पूर, अलकनंदाची पाण्याची पातळी वाढवली
* चमोली जिल्ह्यातील ऋषिगंगा धरण पूर्णपणे वाहून गेले
* 100 हून अधिक मजूर बेपत्ता
* गंगा नदीच्या काठावरील सर्व राज्यातील जिल्ह्यांना अतिसतर्कतेचा इशारा
* मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी पुराचे जुने छायाचित्र वा व्हिडिओ न पसरवण्याचे आवाहन
* पंतप्रधानांचे परिस्थितीवर लक्ष असून, संपूर्ण देश उत्तराखंडबरोबर असल्याची ग्वाही

 

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, सर्वत्र पाणीच पाणी