धौलीगंगाने जल विद्युत प्रकल्प उद्ध्वस्त

राष्ट्रीय

डेहराडून : हिमकडा तुटल्याने ऋषिगंगानंतर तपोवन भागातील धौलीगंगा नदीतील पाणी वाढल्याने जल विद्युत प्रकल्प देखील वाहून गेला आहे.
माहितीनुसार, धौलीगंगा आणि ऋषिगंगा दोन्ही नद्या पाच किलोमीटरच्या परिघात आहेत. धौलीगंगा नदीकिनारी एनटीपीसीचा (राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ) जल विद्युत प्रकल्प अर्थात हायड्रो पावर प्रोजेक्ट सुरू आहे. धौलीगंगाच्या जोरदार प्रवाहात हा प्रकल्प उद्ध्वस्त झाला. याशिवाय याठिकाणी काम करणारे सुमारे 100 ते 150 लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. सीमा रस्ते संस्थाचा (बॉर्डर रोड आॅर्गनायझेशन ) पुलही तुटल्याचे वृत्त आहे.
(सर्व छायाचित्रे साभार)

 

नैसर्गिक आपत्तीत 10 जणांचा मृत्यू, 150 जण बेपत्ता
उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, सर्वत्र पाणीच पाणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *