अभिनेता राजीव कपूर यांचे निधन

राजधानी मुंबई

अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक तसेच दिवंगत ऋषी कपूर यांचे लहान बंधू राजीव कपूर (58 वर्षे) यांचे आज हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले.
आज दुपारच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आल्यानंतर राजीव कपूर यांना चेंबूरमधील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय पथकाने तपासून त्यांना मृत घोषित केले. राजीव कपूर हे रणधीर कपूर आणि दिवंगत ऋषी कपूर यांचे छोटे बंधू आहेत. राजीव कपूर यांनी एक जान हैं हम (1983) या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. राम तेरी गंगा मैली यातील त्यांची भूमिका गाजली होती.

काही चित्रपट
आसमान (1984)
लवर बॉय (1985)
जबरदस्त (1985)
हम तो चले परदेस (1988)

निर्मिती
आ अब लौट चले (1999)
प्रेमग्रंथ…दिग्दर्शन सुद्धा (1996)
हीना (1991)

‘अभिवृत्त’ परिवाराकडून श्रद्धांजली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *