Home राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय गुलाम नबी आझाद यांना राज्यसभातून निरोप

गुलाम नबी आझाद यांना राज्यसभातून निरोप

32

नवी दिल्ली : ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद [ Gulaam Nabi Aazaad  ] यांच्यासह अन्य तीन सदस्याचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाल समाप्त होत असल्याने आज त्यांना निरोप देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांनी शुभेच्छापर भाषणेही केली.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, नाझीर अहमद लवा, शमशेर सिंग आणि मीर मोहम्मद फायेझ या जम्मू आणि काश्मीरचे प्रतिनिधित्व करणाºया चार खासदारांचा कार्यकाल आता समाप्त होत आहे. शमशेर सिंग आणि मीर मोहम्मद फायेझ यांचा कार्यकाल बुधवारी तर गुलाम नबी आझाद, नाझीर अहमद लवा यांचा कार्यकाल १५ तारखेला समाप्त होईल. मागील २८ वर्षे संसदेत कार्यरत असलेल्या गुलाम नबी आझाद यांच्या योगदानाचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात घेतला.

काश्मीरमध्ये गुजरातमधील काही व्यक्तींवर हल्ला झाल्याची घटना घडल्यावर सर्वात पहिला दूरध्वनी आझाद यांचा आला आणि परिवारातील काही सदस्य गमावल्याप्रमाणे ते रडत होते, ही आठवण कथन करताना मोदी बºयाच वेळा भावूक झाल्याचे दिसून आले. जम्मू आणि काश्मीरचे प्रतिनिधित्व करणाºया सर्वा सदस्यांनी सदनामध्ये उत्तम कामकाज करीत भरीव योगदान दिल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here