Home उपराजधानी नागपूर राष्ट्रसंत क्रीडा संकुल जलतरण तलाव सुरू करण्याची मागणी

राष्ट्रसंत क्रीडा संकुल जलतरण तलाव सुरू करण्याची मागणी

43

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडा संकुल सुभाष रोड येथील जलतरण तलाव (स्विमिंग टँक)तातडीने सुरू करण्यासाठी क्रीडा विशेष समितीचे सभापती प्रमोद चिखले यांनी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांना काल सोमवारी निवेदन दिले.
प्रभाग क्र. १७-ड अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडा संकुल येथे नागपूर शहरातील मनपाचे एकमेव ‘स्विमिंग टँक’ दीड वषार्पासून दुरुस्तीच्या कार्यावरून बंद आहे. मात्र, अनेक जलतरणपट्टू तसेच पोहण्याचा सराव करणाºयांची गैरसोय झालेली आहे. तसेच, दुरुस्तीचे कार्य जवळ जवळ ९५ टक्के पूर्ण झाले असून केवळ फिल्टर प्लॅन्टचे कार्य बाकी आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
सदर स्विमिंग टँक बंद असल्यामुळे मनपाचे १५ ते २० लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न थांबल असल्याने काही तांत्रिक अडचणी असल्यास त्या ताबडतोब दूर कराव्यात, असेही चिखले यांनी म्हटले आहे.
यावेळी नरेंद्र गौतम, संध्या आस्वले, मनीषा जिचकार, विभा सावंत, मंदा सारवे, कल्पना सुर्वे, कविता सुरुशे, मोटघरे काका, रशिद भाई, राजेश जाधव, पंकज साळुंके, अभय बावणे, प्रवीण गायधने, मिथून भोंदले,मेघा शिंदे, वर्षा सेलोकर, सुषमा माटे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here