Home राष्ट्रीय कुठे वेतन कापले, तर कुठे 700 कोटींचा बोनस…वाचा काय आहे ते…

कुठे वेतन कापले, तर कुठे 700 कोटींचा बोनस…वाचा काय आहे ते…

60

नवी दिल्ली : मागील एक वर्षभरापासून संपूर्ण जग कोरोनाने वेठीस धरले. केवळ मजूरच नाही तर कंपन्यांही बुडाल्या, काही कंपन्यांनी स्वत: हून भीकेचे डोहाळे जाहीर केले़ काहींनी आपल्या कर्मचाºयांचे वेतन कमी केले, काहींना वेतनच दिले नाही़ त्याचवेळी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘एचसीएल टेक्नॉलॉजी कंपनी’चे [ hcl technology company ] कर्मचारी मात्र मालामाल होणार आहेत. कंपनीच्या कर्मचाºयांना या महिन्यात सुमारे 700 कोटी रुपयांचा विशेष बोनस देणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. मागील वर्षात अर्थात 2020 मध्ये कंपनीला जवळपास 72 हजार 800 कोटी रुपयांचा महसूल मिळाला असल्याने कंपनीच्या वतीने ही घोषणा करण्यात आली आहे.

यासंदर्भात कंपनीच्या वतीने निवेदन जाहीर केले असून, मागील वर्षी कंपनीच्या वतीने कर्मचाºयांसाठी 700 कोटी रुपयांच्या विशेष बोनसची घोषणा करण्यात येत आहे. 2020 साली कंपनीला 10 अब्ज डॉलर्सचा महसूल मिळाल्याने हा निर्णय घेण्यात येत आहे.
तसेच,या उल्लेखनीय कामगिरीचे स्मरण ठेवण्यासाठी आणि सर्व कर्मचाºयांचे आभार मानण्यासाठी हा विशेष बोनस देण्यात येत आहे.

कंपनीने जाहीर केलेल्या या बोनसचा लाभ एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी काम केलेल्या कर्मचाºयांनाच मिळणार असल्याचे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले असून, हा बोनस 10 दिवसाच्या पगाराइतका असेल हेही सांगण्यात आले आहे़
आहे की नाही कंपनीची त्यागी वृत्ती… कारण कोरोनाचा बहाणा पुढे करत कामगारांना कामावरून टाकण्याचा वा त्यांचा पगार कमी करणाºया कंपनी व्यवस्थापनाला ही चांगलीच चपराक आहे. कारण चक्क 700 कोटी रुपयांचा बोनस देणे ‘कोई बच्चों का खेल नही’, असे म्हणणे भाग आहे.