Home राजधानी मुंबई तीरा कामतच्या औषधासाठी आयात कर माफ, देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न

तीरा कामतच्या औषधासाठी आयात कर माफ, देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न

79

मुंबई : पाच महिन्यांच्या बालिकेच्या उपचारासाठी आवश्यक औषधी अमेरिकेतून आयात करण्यासाठी लागणारे सर्व कर माफ करण्याचा निर्णय त्वरित घेतल्याबद्दल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

तीरा कामत [ teera kamat ] ही पाच महिन्यांची बालिका असून, तिला ‘जीन रिप्लेसमेंट’ उपचारांची नितांत गरज आहे. पुढील उपचारासाठीचे औषध अमेरिकेतून आयात करावे लागणार आहे. या औषधावरील सर्व करांतून सूट मागण्यासाठी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवून विनंती केली होती. अमेरिकेहून औषधे मागवण्यासाठी १६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

नेमका आजार?
तीराचे वडील मिहीर कामत यांनी दिलेल्या माहितीनुसार जन्माच्यावेळी तीरा अन्य मुलांच्या तुलनेत थोडी लांब होती. हळूहळू तिच्या आजाराविषयी कळू लागले. आईचे दूध पित असताना तिचा श्वास गुदमरत असे. डॉक्टरांनी तिला ‘एसएमए टाईप 1’ आजार असल्याचे निदान केले. भारतात या आजारावर कोणतेही उपचार नसून तीरा सहा महिन्यांहून अधिक काळ जिवंत राहू शकत नाही. त्यानंतर तीराला वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here