Home अनुपमा... महिला विश्व न जेवता दिवस काढले, कॉल सेंटरमध्ये काम केले आणि चक्क सौंदर्यवती बनली…

न जेवता दिवस काढले, कॉल सेंटरमध्ये काम केले आणि चक्क सौंदर्यवती बनली…

167

रिक्षाचालकाची मुलगी असल्याने शाळेत जाण्याची संधी मिळाली नाही. लहान वयातच काम करण्यास सुरुवात केली. मला अभ्यासही करायचा होता. शेवटी वडिलांनी आईचे दागिने गहाण ठेवले. त्यानंतर आणि परीक्षेची फी भरली आणि पदवी मिळवली. दिवसा अभ्यास करायची आणि रात्री भांडी घासण्याचे काम करीत असे. शिवाय रात्री कॉल सेंटरमध्ये कामही केले.

नागपूर : मनुष्याला आयुष्य एकदाच…आणि त्यात महत्त्वाचं नशिब. आले तर नशिबाने आणि गेले तरी ते नशिबाने; परंतु कष्ट करत संघर्षाने खेचून आणलेले नशिब काही औरच असते़ म्हणूनच त्याचा अभिमान वाटत असतो. असेच काहीसे
उत्तर प्रदेशातील मान्या सिंह [ manya singh] हिच्यासोबत घडले. उपाशी राहून, डोळ्यांत कित्येक झोपा राखून ठेवत तिने यश कमावले, हे थोडके नसे़ कारण ती फेमिना मिस इंडिया 2020 स्पर्धेत ‘फर्स्ट रनर अप’(पहिली नामांकन विजेती) आली.

तेलंगणाची सुंदरी मानसा वाराणसी हिने फेमिना मिस इंडिया 2020 स्पर्धा जिंकली असून, ती विजेती ठरली आहे. तर, मनिका शियोकांड ही सेकंड रनर अप (दुसरी नामांकन विजेती) ठरली आहे. दरम्यान, मान्या सिंहने या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. थोडक्यात मिस इंडियाच्या स्टेजपर्यंत पोहोचण्यासाठी तिने आपली स्वप्न कधी मरू दिली नाही. याबाबत ती सांगते, की मी अनेक दिवस न जेवता, न झोपता काढली. रिक्षाचे भाडे वाचवण्यासाठी अनेक किमी पायी प्रवास केला. माझी मेहनत, हिंमतीने मला साहसी केले, मजबूत केले, ज्यातून स्वप्न पूर्ण करू शकले.

रिक्षाचालकाची मुलगी असल्याने शाळेत जाण्याची संधी मिळाली नाही. लहान वयातच काम करण्यास सुरुवात केली. मला अभ्यासही करायचा होता. शेवटी वडिलांनी आईचे दागिने गहाण ठेवले. त्यानंतर आणि परीक्षेची फी भरली आणि पदवी मिळवली. दिवसा अभ्यास करायची आणि रात्री भांडी घासण्याचे काम करीत असे. शिवाय रात्री कॉल सेंटरमध्ये कामही केले, असेही तिने सांगितले.

आज या स्टेजपर्यंत पोहोचू शकली हे केवळ आई-वडील आणि भावामुळे. आपल्या यशामागे आई-वडील आणि भाऊ असल्याचे तिने सांगितले. त्यांनी खूप पाठिंबा दिला आणि शिकवलेही. आपला स्वत:वर विश्वास असला तर स्वप्न नक्कीच पूर्ण होतात, असा आशावाद मान्याने व्यक्त केला.