Home राष्ट्रीय दाट धुके, पाऊस आणि शंभरहून अधिक वाहने…

दाट धुके, पाऊस आणि शंभरहून अधिक वाहने…

48

टेक्सास : अमेरिकेतील टेक्सासमधील फोर्ट वर्थ [ fort worth ] या भागातून जाणाºया महामार्गावर (हाय वे) एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे किंवा 10 ही नव्हे तर 130 गाड्या एकमेकांवर धडकून झालेल्या अपघातात झाला. यात दुर्दैवाने सहाजणांचा मृत्यू आणि 65 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

स्थानिक पोलिसांनुसार, आय-35 या रस्त्यावर शुक्रवारी सकाळी सहा वाजता हा अपघात झाला असून, दाट धुके आणि भरीस भर याच वेळी आलेल्या पावसामुळे ही दुर्घटना घडल्याचे सुरुवातीला दिसून आले आहे. तसेच, अनेकजण आपल्या वाहनात अडकून पडले आहेत. अंग गोठवणाी थंडी [ high cold in texas] आणि त्यातच कोसळणाºया पावसामुळे ‘आय-35’ हा हाय वे निसरडा झाला होता. दाट धुक्यामुळे समोरचे दिसत नसल्यामुळे सुमारे 130 कार एकमेकांवर आदळल्या असाव्यात, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी काढला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here