Home राष्ट्रीय दिल्लीसह परिसरात 6.1 तीव्रतेचा भूकंप

दिल्लीसह परिसरात 6.1 तीव्रतेचा भूकंप

83

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली आणि परिसरात 6.1 इतक्या मोठ्या तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के [ earthquake shocks ] बसल्याचे वृत्त आहे. यातील केंद अमृतसर येथे होते. दरम्यान, यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याची माहिती आहे.

पंजाब, हरयाणा, जम्मू, उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, दिल्ली राज्यांमध्ये शुक्रवारी रात्री 10 वाजून 31 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवल्याची प्राथमिक माहिती आहे. भूकंपाचे केंद्र अफगणिस्तानात मानले जात असून कझाकिस्तानमध्येही 6.3 रिश्टर स्केलचे धक्के असले असून, यानंतर अनेकांनी घराबाहेर धाव घेतली. दरम्यान, 6.1 रिश्टल स्केल हा तीव्र स्वरुपाचा भूकंप मानला जातो.