व्हॅलेंटाईन डे- संत मताच्या दृष्टिकोनातून

रानशिवार

संत राजिन्दर सिंहजी महाराज

14 फेब्रुवारी ‘संत व्हॅलेंटाईन डे’ च्या रुपात साजरा केला जातो. याविषयी एक गोष्ट प्रचलित आहे की, संत व्हॅलेंटाईन मुलांवर खूप प्रेम करीत असत. एकदा संत व्हॅलेंटाइन यांना कैदखान्य मध्ये बंद केले गेले आणि त्यांची आवडती मुलं हे सहन करू शकले नाही. या मुलांनी कागदांच्या लहान लहान तुकड्यांवर आपल्या कोमल भावना व्यक्त केल्या आणि काही कैदखान्यात त्यांच्यापर्यंत पोहोचविल्या. कदाचित इथूनच प्रेमाच्या परिपूर्ण भावनांचे आदानप्रदान करण्याची प्रथा आरंभ झाली, जिचा आजपर्यंत समयानुसार अनेक रूपात बदल झाला आहे.

तथापि आजच्या युगामध्ये व्हॅलेंटाईन डे, प्रेमी आणि प्रियतमामधील एक उत्सव राहिला आहे; परंतु याचा सुद्धा एक आध्यात्मिक दृष्टीकोन आहे. व्हॅलेंटाईन डे, संत व्हॅलेंटाईन व त्यांचे शिष्य यांच्यामधील प्रेमाचे प्रतिक आहे. हे प्रतीक आहे आध्यात्मिक प्रेमाचे, जे गुरू आणि शिष्य यामध्ये किंवा प्रभू व भक्त यांमध्ये जे की मानवाचे संपूर्ण सृष्टी व मानवते करिता असते.

मनुष्य असण्याचे आपले परम ध्येय स्वत:ला ओळखणे व परमात्म्याला प्राप्त करणे आहे. या ध्येयाला प्राप्त करण्याचे साधन प्रेम हेच आहे. शिखांचे दहावे गुरु ‘गुरु गोविंद सिंहजी महाराज’ यांनी म्हटले आहे,” साच कहु सून लहो सभेह, जिन प्रेम कियो तिनही प्रभू पायो।”

परमात्मा प्रेमस्वरूप आहे, आपला आत्मा परमात्म्याचा अंश असल्यामुळे तेच परमात्म्याचे सर्व गुण त्याच्यामध्ये पण आहेत. अशाच प्रकारे आपला आत्मा सुद्धा परमात्म्याचा अंश आहे आणि परमात्मा प्राप्तीचा मार्ग सुद्धा प्रेमाचाच मार्ग आहे.

प्रश्न असा आहे की हे प्रेम मिळते कुठे? या दिव्य प्रेमाची किरणे पूर्ण महापुरुषांच्या प्रभू प्रेमामध्ये मदमस्त असलेल्या नेत्रा द्वारे आपल्यापर्यंत येतात. आपल्या वषार्नुवर्षे निद्रावस्थेतील आत्म्याला हळूहळू जागृत करतात आणि चेतनते च्या महासागरापर्यंत ची यात्रा पूर्ण करतात. वास्तवत: स्वत: परमात्माच संत सद्गुरुंच्या रूपामध्ये आपल्या अंशाना पुन्हा परत घेऊन जाण्या करिता येतात. संत सद्गुरू त्याना जागृत करण्या करिता केवळ प्रेमाचा प्रयोग करतात.

 

हे सामर्थ्य केवळ संत सद्गुरू मध्येच असते की प्रेमाचे पात्र परिवर्तित करून हृदयाला परमार्थाच्या मार्गावर चालविते. संत सद्गुरूंच्या अनंत प्रेमाचा अनुभव प्राप्त करूनच आत्मा भीती, भ्रम आणि द्वैताच्या जखडेतुन मुक्त होऊ शकतो.

शतकानुशतके संत महापुरुष प्रभू प्रेम व गुरुप्रेम यास अत्याधिक महत्त्व देत आलेले आहेत. ईसाई धमार्चे प्रमुख संत येशू ख्रिस्त यांचा मूळ संदेश प्रेमाचा संदेश होता. येशूने आपल्या शिष्यांना जो महान संदेश दिला तो दोन उपदेशांमध्ये सामावलेला आहे.
‘आपण आपल्या परमात्म्यावर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण आत्म्याने, तसेच पूर्ण मनाने प्रेम करावे. आणि आपल्या शेजाºयावर आपल्या सारखेच प्रेम करावे’ आणि त्यांनी स्पष्ट केले की या दोन नियमांवर सर्व नियम आणि पैगंबर आधारित आहेत. (मैथ्यू – 22:37 39:40)

येशूने या दोन उपदेश केवळ दिलेच नाही; परंतु या नुसार ते जगले सुद्धा. हीच संतांची खरी विशेषता आहे. कारण ते प्रेमाची प्रतिमूर्ती असतात.

प्रभू प्रेम आहे, आपला आत्मा त्याचा एक किरण आहे आणि प्रेम एकीकडे प्रभू आणि मानवांमध्ये, तसेच दुसरीकडे मानव आणि प्रभूच्या सृष्टी मधील एक सूत्र आहे. प्रेम जीवन आणि प्रकाशाच्या नियमाची पूर्णता करते.

चला तर, आपण विचार करूया की आपल्या जीवनात हे प्रेम झळकते का? काय आपण एकमेकांशी प्रेमाने सेवा करतो का? आपण त्यांच्या प्रती उदार तसेच सहनशील आहोत, आपले ज्यांचे विचार आपल्याहून भिन्न असतात? काय प्रभू च्या सर्व जीवांवर आपण प्रेम करतो का? तसेच त्यांना आपले समजून जवळ करतो का? दलितांप्रति आपल्या मध्ये दया आणि सहानुभूती आहे का? आपण आजारी आणि पीडितांना करिता प्रार्थना करतो का? जर आपण प्रेमाने रहात नसू, तर आपण प्रभूपासून खूप दूर आहोत, तसेच धर्मापासून ही दूर आहोत.

जर आपण खºया अर्थाने प्रभुवर प्रेम करत असू तर आपणास हे आपल्या आचरणात आणले पाहिजे. का नाही या व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी आपण भौतिक प्रेमापेक्षाही जास्त आध्यात्मिक प्रेमावर ध्यान द्यावे. आपण स्वत:ला एक मानव बनवूया जो की पूर्ण मानवते प्रति संपूर्ण सृष्टी प्रति प्रेम व करूणेचा भाव ठेवेल. व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची हीच सर्वोत्तम पद्धत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *