Home राष्ट्रीय आंध्रात भीषण अपघात, 14 मृत

आंध्रात भीषण अपघात, 14 मृत

79

 

देशभरात मागील काही दिवसांपासून भीषण अपघाताचे सत्र सुरू असून, आज सकाळी आंध्र प्रदेशातील कर्नुल जिल्ह्यातील मदारपुर गावाजवळ बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. यात 13 ते 14 जण मृत्युमुखी पडले. तसेच, अन्य काहीजण जखमी झाल्याचे समजते.

माहितीनुसार, बसमधील 18 जण चित्तूर जिल्ह्यातील मदनापल्ले येथून राजस्थानातील अजमेरकडे निघाले होते. कर्नुलपासून जवळपास 25 किलेमीटरच्या अंतरावर मदापुरमच्या वेलदुर्तीजवळ रविवारी पहाटे 4 वाजता भरधाव वेगातील बसने दुभाजकाला धडकून समोरून येणाºया ट्रकला टक्कर दिली. यात 13 ते 14 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघातातून वाचलेली चार बालकांपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. पोलिस आधार कार्ड आणि फोन नंबरच्या माध्यमातून अपघातातील नागरिकांची ओळख पटवण्याचे काम करत असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.

उत्तर प्रदेशात सहा अपघाती मृत
उत्तर प्रदेशातील कनौज जिल्ह्यात तालग्राम परिसरात आग्रा-लखनऊ एक्सप्रेस वे वर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने एकूण 6 जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी सकाळी घडली. ही सर्व एकाच कुटुंबातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.