Home उपराजधानी नागपूर नागपुरात कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनेची कडक अंमलबजावणी करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

नागपुरात कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनेची कडक अंमलबजावणी करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

59

नागपूर : नागपूरमध्ये मागील काही दिवसांत अचानक कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्यानं कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनेची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत [ niteen raut ] यांनी दिले आहेत. तसेच, त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात तातडीची आढावा बैठक बोलावून रुग्ण संख्या का वाढत आहे, याबाबत माहिती जाणून घेतली.

कोविड चाचण्यांची संख्या वाढवावी, धार्मिक स्थळे आणि अन्य माध्यमातून नागरिकांना मास्कचा वापर आणि कोरोना संदर्भातील नियमांचं पालन करण्यासाठी जनजागृती करावी, स्वयंसेवी संस्थांनी मागील वषी प्रमाणे यावर्षी देखील कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये सहभागी व्हावे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी आपापल्या विभागात, गावात, शहरात, वार्डात जनजागृती करावी. लग्नसमारंभातील वाढत्या उपस्थितीवर निर्बंध घालावेत, अशा काही सूचना डॉ. नितीन राऊत यांनी बैठकीत दिल्या.