Home नागपूर नागपुरातील फेज ३ ची मेट्रो अमरावती रोडला जोडण्याची केंद्रीय मंत्री नितिन गडकरी...

नागपुरातील फेज ३ ची मेट्रो अमरावती रोडला जोडण्याची केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची घोषणा

45

नागपूर : फेज ३ ची मेट्रो अमरावती रोडला जोडली जाईल, अशी घोषणा केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी [ cabinate minister niteen gadkari ]  यांनी केली आहे. नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर विमानतळ ते चिंचभवन दरम्यान बांधलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण रविवारी गडकरी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

केंद्रीय रस्ते निधीतून ११४ कोटी रुपयांच्या निधीतून रहाटे कॉलनी ते खापरी उड्डाणपुलापर्यं व्हाईट टॉपिंगची सुधारणा, खापरी रेल्वे उड्डाणपूल ते मनीषनगर लेव्हल क्रॉसिंगपर्यंत क्रॉक्रीट रोड आणि शुक्रवार तलाव ते अशोक चौक या सीमेंट क्रॉक्रिट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झाले.

यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी खासदार दत्ता मेघे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे क्षेत्रीय अधिकारी राजीव अग्रवाल उपस्थित होते. रेल्वेमुळे प्रलंबित असलेल्या ८१ उड्डाण पुलांबाबतही आपण बैठक घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. गृहमंत्री अनिल देशमुख यावेळी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. नागपूर ते काटोल हा चार पदरी रस्ता लवकर व्हावा यासाठी महामार्ग मंत्रालयानं प्रयत्न करावेत, अशी विनंती त्यांनी गडकरी यांना केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here