Home राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय देश अपघातग्रस्त होतो की काय, मध्य प्रदेशातील बस अपघातात ३५ प्रवाशांचा मृत्यू

देश अपघातग्रस्त होतो की काय, मध्य प्रदेशातील बस अपघातात ३५ प्रवाशांचा मृत्यू

65

भोपाळ : मागील काही दिवसांपासून देशाच्या कानाकोपºयात अपघात होत आहेत. अक्षरश: रांग लागल्याचा अनुभव येत आहे़ अशातच आज सकाळी साडेसातच्या सुमाराला मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात बस कालव्यात कोसळून सुमारे ३५ प्रवाशांचा मृत्यू [satana sidhi accident ] झाल्याचे सांगण्यात येत आहे.

माहितीनुसार, सदर बस सिधीकडून सतनाकडे जात होती. यावेळी जवळपास ६० प्रवासी प्रवास करत होते. छुहियाघाटी येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस बाणसागर प्रकल्पाच्या कालव्यात कोसळली. दुर्दैवाने वाहन पाण्यात पूर्णपणे बुडाल्याचे दिसून येत असून, अपघाताची भीषणता लक्षात येते. अन्य एका माहितीनुसार,या या घटनेत चाळीसपेक्षा अधिकांचा मृत्यू झाला आहे. यात महिला आणि बालकांचाही समावेश आहे. दुर्घटनेबाबत माहिती मिळताच राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या पथकानेघटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. कालव्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान [ shivraajsingh chauhaan] यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून, सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले आहे. सरकारच्या वतीने मृतकांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. याशिवाय केंद्र सरकारच्या वतीनेही मदत घोषित करण्यात आली.

नजिकच्या काळातील काही अपघात

– 15 फेब्रुवारी 2021 : जळगांवमधील रावेर तालुक्यात ट्रक उलटला,15 मृत

– 15 फेब्रुवारी 2021 : तेलंगणात महाराष्ट्रातील शिवशाही बसला भीषण अपघात; 38 जण जखमी, 17 गंभीर

– 14 फेब्रुवारी 2021 : महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील कार देऊळगांव राजा मार्गावर विहिरीत कोसळली, मायलेकी मृत (दोन दिवसांतील दुसरी घटना)

– 12 फेब्रुवारी 2021 : देऊळगांव राजा मार्गावरील विहिरीत कार कोसळली, दोघे मृत

-14 फेब्रुवारी 2021 : आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे 14 जणांचा मृत्यू, चार गंभीर

-9 फेब्रुवारी 2021 : उत्तर प्रदेशात वाराणशी जोनपूर महामार्गावर ट्रक आणि पिकअप वाहनात धडक, सात मृत,10 जखमी

-30 जानेवारी 2021 : उत्तर प्रदेशातील मुरादाबाद आग्रा महामार्गावर कन्टेनर ट्रक आणि मिनी बस यांच्यात धडक होऊन 10 ठार

– 20 जानेवारी 2021 : पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे डम्पर उलटले, 13 मृत

-19 जानेवारी 2021 : गुजरातमधील सुरज जिल्ह्यात पादचारी मार्गावर झोपलेल्या 18 मजुरांना चिरडले, 15 मृत

(छायाचित्रे साभार)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here