Home उपराजधानी नागपूर अपघात थांबेना, महाराष्ट्रात पाच मृत

अपघात थांबेना, महाराष्ट्रात पाच मृत

77

नागपूर : महाराष्ट्रातील अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. सोमवारी पहाटे जळगांव जिल्ह्यात ट्रक अपघातात 15 जणांचा बळी गेला असतानाच सोमवारच्याच मध्यरात्रीनंतर (मंगळवारी पहाटे) मुंबई-पुणे एक्स्प्रेस हाय वेवर पाच जणांचा अपघाती मृत्यू झाला. (यात एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे.) तसेच पाचजण जखमी असून दोघे गंभीर अवस्थेत असल्याची माहिती आहे. हे.

माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर सोमवारी मध्यरात्रीनंतर मुंबई लेनवर खालापूर टोल नाक्याजवळ भरधाव कंटेनरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुढे जाणाºया इनोव्हा, क्रेटा, टेम्पो, ट्रक अशा चार वाहनांना मागून जोरदार धडक दिली. यात गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाला असून, घटनास्थळाचे भीषण दृष्य दिसून आले.

मुंबईच्या गोरेगावमधील मंजू प्रकाश नाहर (वय 58), नवी मुंबईच्या नेरुळ याठिकाणचे डॉ. वैभव वसंत झुंजारे (41), उषा वसंत झुंजारे (63), वैशाली वैभव झुंजारे (38), श्रिया वैभव झुंजारे (5) अशी या अपघातात मृत पावलेल्यांची नावे आहेत. झुंजारे कुटुंबातील 11 वर्षीय अर्णव वैभव झुंजारे याच्यावर उपचार सुरू आहेत.

15 मजुरांचा जागीच मृत्यू
यापूर्वी सोमवारी (15 फेब्रुवारी 2021) पहाटे जळगांव जिल्ह्यात अंकलेश्वर-बºहाणपूर राज्यमार्गावर किनगावजवळ पपयांचा ट्रक उलटून तीन बालकांसह 15 जणांचा मृत्यू झाला. यात 12 मजुरांचा समावेश आहे. जण जखमी झाले आहेत. माहितीनुसार पपया भरलेला आयशर ट्रक चोपडाकडून यावलकडे येत होता. किनगावजवळ एका वळणावर ट्रकचा रॉड तुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन उलटून दुर्घटना घडली.