Home राष्ट्रीय बंगालचे मंत्री झाकिर हुसैन यांच्या गाडीवर बॉम्बहल्ला

बंगालचे मंत्री झाकिर हुसैन यांच्या गाडीवर बॉम्बहल्ला

66

कोलकाता : पश्चिम बंगालचे मंत्री झाकिर हुसैन [minister zakir husain ] यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कारवर बॉम्ब फेकला असून, झाकिर हुसैन गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुशिदार्बाद जिल्ह्यातील रघुनाथगंज परिसरातील ही धक्कादायक घटना आहे. लोकमत 18 ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

माहितीनुसार, कोलकात्यात तृणमूल काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. यासााठी ते निमतिता स्टेशनच्या दिशेने जात असताना त्यांच्या कारवर बॉम्ब हल्ला करण्यात आला. ज्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांना तत्काळ जंगीपूर महकमा स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.