Home राष्ट्रीय सिधी बस अपघात : 47 प्रवाशांचे मृतदेह हाती,दुर्घटना होण्यास केवळ एक सेकंद...

सिधी बस अपघात : 47 प्रवाशांचे मृतदेह हाती,दुर्घटना होण्यास केवळ एक सेकंद पुरेसा

120

भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये सिधी जिल्ह्यात रिवा-सिधी सीमाजवळ मंगळवारी सकाळी झालेल्या बस अपघातात आतापर्यंत 47 प्रवाशांचे मृतदेह हाती लागले आहेत. पाच जण अद्यापही बेपत्ता आहेत. अन्य एका वृत्तानुसार एकूण 51 प्रवाशांचा मृत्यू झाला. चालकाने बस वेगाने चालवल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाल्याची माहिती देण्यात येत आहे.

माहितीनुसार, सदर बसमधून 55 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी जवळपास 30-35 विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येते. या अपघातात काहींना सुखरुप वाचवण्यात यश आले असून अद्याप पाच जण बेपत्ता आहेत. दुर्घटनेनंतर राष्ट्रपती रामनाथ कोशारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच, शासनाच्या वतीने आर्थिक मदत जाहीर करण्यात आली.

काही प्रश्न
* विविध वृत्तसंस्थानुसार, संबंधित बसमध्ये केवळ 32 प्रवाशांची क्षमता होती. मात्र, 60 हून अधिकांचा समावेश

* 32 बैठकीच्या प्रवाशांच्या बसेसना के वळ 75 किमी अंतरापर्यंत प्रवास करता येतो; परंतु ही बस सतनापर्यंत अर्थात 138 किमीचा प्रवास करणार होती.

* सदर बसमधून ‘आरआरबी एनटीपीसी’ ही परीक्षा देणारे काही विद्यार्थी प्रवास करत होते़ त्यांना केंद्रावर पोहोचण्यास उशीर होऊ नये, यासाठी बसचा मार्ग बदलण्यात आला. ही परवानगी कुणी दिली?
असे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

आमची भूमिका
या संदर्भात आम्ही सध्या अपघाताविषयी सर्वेक्षणात्मक अहवालनिर्मितीवर काम करत असलेले संजय मुंदलकर यांच्याशी संपर्क साधला़ ते म्हणाले, की सार्वजनिक असो वा खाजगी प्रवासी वाहनातून प्रवास करताना प्रवाशांनीच ‘अलर्ट’ (अतिदक्ष) राहण्याची वेळ आली आहे. कुणी एखादा चालक
मोबाईलवर बोलत असेल…
दारूच्या नशेत असेल…
वेगाने वाहन चालवत असेल…
अशास्थितीत तत्काळ राज्य परिवहन अधिकाºयांना कळवावे़ शक्य झाल्यास त्यांना छायाचित्रण (व्हीडिओ शूटिंग) वा छायाचित्र (फोटोज) पाठवण्याचा प्रयत्न करावा. 100 या क्रमांकावर पोलिसांना कळवावे.
शिवाय वाहकाला माहिती तत्काळ माहिती द्यावी़ बसमधील अन्य प्रवाशांच्याही ही बाब लक्षात आणून द्यावी. जर चालक नशेत असेल, तर तातडीने वाहन थांबवून त्याला पोलिस वा राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाºयांच्या ताब्यात द्यावे. कारण दुर्घटना होण्यास केवळ एक सेकंद पुरेसा ठरत असतो.