नागपुरात मंगल कार्यालयांवर केली अशी रोखठोक कार्यवाही

उपराजधानी नागपूर

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या ‘उपद्र्रव शोध पथका’च्या जवानांनी बुधवारी सर्व १० झोनच्या अंतर्गत येणाºया ९० मंगल कार्यालय, लॉन आदींची तपासणी केली.
शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग बघता मंगल कार्यालय, लॉन तसेच गर्दीचे ठिकाण ‘हॉटस्पॉट’ ठरू शकतात. हा धोका लक्षात घेता मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी मंगल कार्यालयांवर कडक कारवाई करण्याचे सक्त आदेश निर्गमित केले आहे. मंगळवारी शोध पथकांच्या जवानांनी ७ सभागृहांवर कारवाई करत ३७ हजार रुपयांचा दंड वसूल केला. बुधवारी कोणत्याही सभागृहात लग्न समारंभ होताना दिसून आले नाही. मनपा आयुक्तांनी मंगळवारी साथरोग अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चा वापर करून आदेश दिले आहेत. या अंतर्गत गर्दी जमवून नियमांचे उल्लंघन करणाºयांसाठी आकारण्यात येणारा दंड वाढविला आहे. सभागृह, मंगल कार्यालय, लॉन इ. कार्यक्रम स्थळी व्यवस्थापकाने कोविड-19 नियमांचे उल्लंघन केले, मास्क, सेनेटायझरचा वापर केला नाही, गर्दी जमविल्यास पहिल्यावेळी १५ हजार रुपये दंड आकारण्यात येईल. दुसºयांदा नियम मोडल्यास २५ हजार रुपये तसेच तिसºयांदा नियम मोडल्यास ५० हजार रुपये दंड आकारला जाईल. आयोजकांवरही आता १० हजार दंड आकारण्यात येणार असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *