Home राजधानी मुंबई राज्य सरकारचे तीन मंत्री कोरोनाबाधित

राज्य सरकारचे तीन मंत्री कोरोनाबाधित

71

मुंबई : राज्य सरकारने कोरोनासंबंधी संचारबंदीसारखा निर्णय घेतला असताना तीन मंत्र्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठी वाढ होऊ लागली आहे. अकोला, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात जमावबंदी करण्यात आली आहे़ तर दुसरीकडे सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणाºया राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे नेते तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे [ health minister rajesh tope  ] यांचाही कोरोना चाचणीचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला आहे. मंत्री टोपे यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.

याशिवाय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचाही कोरोना अहवाल सकारात्मक आल्याची माहिती असून त्यापूर्वी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे.