Home राष्ट्रीय …विमानाच्या पंख्याने चक्क वीज खंबा जमीनदोस्त केला, पहा कसा….

…विमानाच्या पंख्याने चक्क वीज खंबा जमीनदोस्त केला, पहा कसा….

38

विजयवाडा : विजयवाडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना एअर इंडियाच्या एका विमानाला लहानसा अपघात झाला असून, यातील सर्व प्रवाशी सुखरुप असल्याची माहिती आहे. हा अपघात शनिवारी दुपारी 4.50 वाजता घडला आहे.

माहितीनुसार, एअर इंडियाचे विमान गन्नवरममधील विजयवाडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर [ vijaywada international airport ] उतरत असताना ते पाच क्रमांकाच्या धावपट्टीवर जात असताना अनियंत्रित झाले.
वास्तविक ते मधल्या पिवळ्या पट्टीवरून जाणे अपेक्षित होते;परंतु ते कडेच्या पिवळ्या पट्टीवरून पुढे गेले. परिणामी, फ्लाईटच्या उजव्या पंख्याला विद्युत खांबाची जोरदार धडक बसली. या धडकेत विजेचा खांब जमीनदोस्त झाला. दरम्यान, विमानातील सर्व 64 प्रवासी आणि क्रू मेंबर सुरक्षित असल्याची माहिती विमानतळाचे संचालक जी मधुसूदन राव यांनी दिली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here