Home राष्ट्रीय हजारो फुट उंचीवर उडत होते अमेरिकन विमान, इंजीनला आग लागली आणि….

हजारो फुट उंचीवर उडत होते अमेरिकन विमान, इंजीनला आग लागली आणि….

63

वॉशिंग्टन : अमेरिकेचे विमान यूए 328 [ US Aircraft UA 328 ] हवेत गेल्यानंतर काहीच वेळात इंजीनमध्ये बिघाड झाल्याने तातडीने उतरावे लागले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदरची घटना 20 फेब्रुवारीला घडली आहे.

अमेरिकन एअरलाईन्स फ्लाईट यूए 328 हे विमान डेन्व्हर ते होनोलूलू असा प्रवास करत होते. आकाशात हजारो फुट उंचीवर उडत असताना त्याच्या इंजीनमध्ये बिघाड आग लागल्याचे दिसून आले. या नंतर त्याला उतरवण्यात आले; परंतु हवेत असताना वा उतरताना कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे
विमान वाहतूक प्रशासनाने म्हटले आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ समाज माध्यमात पसरला असून, इंजीनला आग लागल्याचे स्पष्ट दिसत आहे.