Home उपराजधानी नागपूर नितीन गडकरी म्हणाले, नागपूरहून अमरावतीत दीड तासांत पोहोचणार… पहा कसे

नितीन गडकरी म्हणाले, नागपूरहून अमरावतीत दीड तासांत पोहोचणार… पहा कसे

56

नागपूर : नागपुरातील प्रस्तावित ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाचे अनुकरण संपूर्ण देशात होईल, असा विश्वास सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री तसे रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी [ cabinate minister niteen gadkari ] यांनी व्यक्त केला आहे.
ते काल नागपुरात ब्रॉडगेज रेल्वे मेट्रोसाठी आयोजित गुंतवणूकदार मेळाव्यात बोलत होते. महामेट्रो आणि केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गत विकास संस्था (नागपूर) यांनी संयुक्तरित्या हा मेळावा आयोजित केला होता.

भारतीय रेल्वेच्या ब्रॉडगेज मार्गावर मेट्रो कोचेस चालवून नागपूर नजीक सॅटेलाइट सिटीज नागपूरला जोडणे हा प्रस्तावित ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. या ब्रॉडगेज प्रकल्पातल्या रेल्वे डब्यांची मालकी खाजगी गुंतवणूकदारांना देणं गुंतवणूकदार, प्रवासी, भारतीय रेल्वे महामेट्रो तसेच एमएसएमई ला पूरक आणि फायदेशीर असेल. हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प असून आर्थिकदृष्टया सक्षम असेल आणि त्याचे अनुकरण संपूर्ण देशात होईल, असा दावा त्यांनी केला.

या ब्रॉडगेज रेल्वेचा वेग १२० किलोमीटर प्रतितास असून यामुळे नागपूर ते अमरावती अंतर केवळ दीड तासात कापणे शक्य होणार आहे. ‘ब्रॉडगेज मेट्रो’मध्ये विमानाप्रमाणेच इकॉनोमी तसेच बिझनेस क्लास असतील. त्यात मनोरंजन, खानपान सुविधा उपलब्ध असेल. या मेट्रोमध्ये जाहिराती, खानपान आणि इतर मनोरंजनाच्या सुविधा, वस्तू विक्रीचे अधिकार संबंधित खाजगी गुंतवणूकदारांना असतील. या मेट्रो प्रकल्पाची सुरुवात एक-दीड वर्षात होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here