Home उपराजधानी नागपूर नागपुरातील कोरोना निर्बंधांसंबंधी नियमावली…

नागपुरातील कोरोना निर्बंधांसंबंधी नियमावली…

38

नागपूर : पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्यामुळे नागपूर जिल्ह्यात तसेच शहरात 22 फेबु्रवारीपासून लागू करण्यात येत असलेले निर्णय पुढीलप्रमाणे जाहीर केले आहे.

– मा. मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेली मी जबाबदार मोहीम शहरात व जिल्ह्यात प्रभावीपणे राबविणार.
– कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील शाळा,महाविद्यालये, कोचिंग क्लासेस 7 मार्च 2021 पर्यंत बंद ठेवणार.
-जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा शनिवार व रविवार (अत्यावश्यक सेवा -वृत्तपत्र, दूध भाजीपाला, फळे, पेट्रोल पंप, औषध वगळून) बंद ठेवणार.
-आठवडी बाजारामुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी आठवडी बाजार 7 मार्च 2021 पर्यंत बंद ठेवणार.
-जिल्ह्यातील हॉटेल (रेस्टॉरंट्स) 50 टक्के क्षमतेने रात्री 9 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी.
-लग्न, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रम 7 मार्च 2021 पर्यंत बंद; परंतु मंगलकार्यालय / लॉन्स / रिसॉर्ट 25 फेब्रुवारीपासून 7 मार्च 2021 पर्यंत बंद राहतील.
-कोविड सेंटर [ kovid centers ] पुन्हा सुरू करणार.
कोरोना प्रतिबंधासाठी गृहभेटीची संख्या वाढवून फ्ल्यू, आयएलटी तसेच सारीची तपासणी करणार.
– शहरातील तसेच जिल्ह्यातील नवीन हॉटस्पॉट झोन येथे इमारत, लेन, मोहल्लानिहाय मायक्रो कन्टोन्मेंट झोन तयार करून सक्तीने उपाययोजना. हॉटस्पॉट भागावर अधिक लक्ष.
-मास्क न वापरणाºयांवर दंडात्मक कारवाई.
– नियम पाळून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
-जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी़
-आॅनलाईन सर्व सेवा (खाद्य पुरवठा) सुरू राहतील.
-शासकीय आणि खासगी प्रयोगशाळेमध्ये पूर्ण क्षमतेचा वापर करून नमुना तपासणी.
-त्रिसूत्रीचे पालन अनिवार्य.
-कोविडसंदर्भात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा दररोज विभागीय आयुक्त आढावा घेणार.

 

पालकमंत्री राऊत यांनी नागपुरातील कोरोना निर्बधांबाबत दिली ‘ही’ माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here