जगात आरोग्य व्यवस्थेत भारताची प्रतिमा आणि आत्मविश्वास नव्या पातळीवर : पंतप्रधान मोदी

राष्ट्रीय

MEDICAL WEBINAR : जगात आरोग्य व्यवस्थेत भारताची प्रतिमा आणि आत्मविश्वास नव्या पातळीवर पोचला असून कोरोना संकटाच्या काळात आरोग्य क्षेत्रातल्या भारताच्या ताकदीची दखल जगाने घेतली असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी केले आहे.
ते आज आरोग्यक्षेत्राविषयीच्या वेबिनारमधे बोलत होते.

सरकारने कोरोनाच्या संकटकाळात अल्पावधीत उत्तम आरोग्यविषयक पायाभूत सुविधा निर्माण केल्या. सरकार आणि खासगी क्षेत्राच्या समन्वयातून चाचणी प्रयोगशाळांचे व्यापक जाळे उभारण्यात आल्याने या आजाराला प्रभावीरित्या तोंड देता आल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी केलेली अभूतपूर्व तरतूद सरकारची देशवासियांच्या आरोग्याबद्दलची बांधिलकी दाखवणारी आहे. आरोग्य क्षेत्रावर ७० हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे यासंबंधीच्या सुविधांमधे सुधारणा होण्यासह अधिक रोजगारही निर्माण होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

चार आघाड्या
लोकांना निरोगी ठेवण्यासाठी भारत एकाचवेळी चार आघाड्यांवर काम करत आहे. पहिल्या आघाडीवर आजाराला आळा आणि आरोग्याला उत्तेजन, दुसºया आघाडीवर गरिबांना स्वस्तात परिणामकारक उपचार पुरवण्यावर भर दिला असून तिसºया आघाडीवर आरोग्य विषयक पायाभूत सुविधा आणि आरोग्य क्षेत्रातले व्यावसायिक यांची संख्या आणि गुणवत्ता वाढवण्यात येत आहे. तसेच, चौथी आघाडीत समस्यांवर मात करण्यासाठी सतत काम करत राहणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय २०२५ पर्यंत देशातून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याचे लक्ष्य भारताने निश्चित केले असल्याचा पुनरुच्चारही पंतप्रधानांनी यावेळी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *