शेतकºयांना दिवसा वीज पुरवण्यासंबंधी सरकारने दिला ‘हा’ आदेश

उपराजधानी नागपूर

मुंबई : राज्यात वीजदर कमी करून शेतकºयांना दिवसा ८ तास वीज पुरवठा देण्यासाठी नियोजन करण्यात यावे, असे निर्देश ऊर्जांमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला [ mahavitaran ] दिले. ते आज मंत्रालयात यासंदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते.

अन्य राज्याच्या तुलनेत औद्योगिक ग्राहकांचे वीज दर जास्त असल्याने राज्यात उद्योगधंद्यांच्या वाढीत अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे उद्योगांचे वीजदर किमान १ रुपया प्रतियुनिटने कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत़ घरगुती आणि वाणिज्यिक दरही कमी करण्यासाठी नियोजन करावे, असे निर्देश राऊत [ dr niteen raut ] यांनी यावेळी दिले.

नवीन कृषिपंप वीज धोरणात शेतकºयांना आठ तास वीज देण्याचे नियोजन आहे. मात्र, कृषिपंप वीज वाहिन्या अतिभारीत होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने वीज वाहिन्यांचे जाळे सक्षम करणे, रोहित्रांची संख्या आणि क्षमता वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम त्वरित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

राज्यात उद्योगाला चालना देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील असून भविष्यात विजेची मागणी वाढणार असल्याने स्वस्त विजेची खरेदी करण्यासाठी आराखडा तयार करा, असेही निर्देश त्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *