Home उपराजधानी नागपूर देशात अपघातसत्र सुरूच, माजी मंत्री मुनगंटीवारांचे नातेवाईक मृत

देशात अपघातसत्र सुरूच, माजी मंत्री मुनगंटीवारांचे नातेवाईक मृत

93

नागपूर : देशात अपघातसत्र सुरूच असून, आज माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दोन नातेवाईकांचा मृत्यू झाला़ तर, उत्तर प्रदेशात यमुना द्रूतगती मार्गावर डिझेल टँकर आपली बाजू सोडून समोरून येणाºया कारवर आदळल्याने सातजणांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले़ ही दुर्घटना मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील चकलाबा जवळ भीषण अपघात झाला आहे या अपघातात भाजपा चे जेष्ठ नेते तथा माजी अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चूलत बहीण आणि भाऊजी जागीच यात ठार झाले आहे. माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील चकलाबा तींतरवनीच्या दरम्यान मातोरी येथे बुधवारी सायंकाळी सुधीर मुनगंटीवार यांच्या चुलत बहीण ममता तगडपल्लेवार आणि भाऊजी विलास तगडपल्लेवार हे दोघे पुसद येथून स्वत:च्या वाहनाने पुण्याला मुलाला भेटण्यासाठी निघाले होते. तींतरवणी येथे त्यांची चारचाकी गाडी भरधाव वेगात असल्याने पुलाखाली आदळली़ यात दोघे पतीपत्नी जागीच ठार झाले.

उत्तर प्रदेशात सात ठार
मथुरा : भरधाव डिझेल वाहून नेणाºया टँकर कार वाहनावर उलटल्याने सातजणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना यमुना एक्स्प्रेस वेवर मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मथुरा येथील नौहझील परिसरात माईल स्टोन 68 जवळ घडली आहे.
कारण : चालक आपले टँकर वाहन वेगात चालवत असल्याने त्याचे नियंत्रण सुटले आणि दुभाजक तोडून टँकर दुसºया बाजूला उलटला. यावेळी टँकरची धडक इनोव्हा समोरून येणाºया इनोव्हा कारला धडक बसली आणि कारमधील सातजणांचा जागीच मृत्यू झाला.

रविवारी रात्री दुर्घटना
अहमदनगरकडून औरंगाबादकडे जात असलेल्या लक्झरी बसला स्विफ्ट कारची रविवारी (22 फेब्रुवारी) मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास अपघात झाला. ही दुर्घटना श्री क्षेत्र देवगड फाट्याजवळ घडली.
ही धडक इतकी भीषण होती, की कार ट्रॅव्हल्सच्या समोरील बाजूवर धडकून तिच्यात शिरली. अपघातात कारमधील पाच जणांना जागीच प्राण गमवावे लागले. मृत्युमुखी पडलेले सर्व जण जालना जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे.

आमची भूमिका
कोणत्याही वाहन अपघातात ‘वेग’ हा महत्त्वाचा घटक ठरत असतो़ हाताबाहेर गेलेली गोष्ट ज्याप्रमाणे नियंत्रित करता येत नाही, त्याचप्रमाणे वेगाने हाकणाºया वाहनाला नियंत्रित करणे दुरापास्त ठरते आणि नेमक्या त्याच वेळी दुर्घटना होऊन बसते. मागील काही घटनांमध्ये आपल्या वाहनांवर नियंत्रण न मिळवता आल्याने दुभाजक तोडून वा ते ओलांडून दुसºया बाजूला समोरून येणाºया किंवा उभे असलेल्या वाहनाला धडकून, त्यावर उलटण्याच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. आणि अशातच दुसºया बाजूने जाणाºया वाहनाची, त्याच्या चालकाची, त्यातून प्रवास करणाºया लोकांची कोणतीही चूक नसताना त्यांना क्षणात जीव (जो कधीही परत येऊ शकत नाही) गमावून बसावे लागते.
त्यामुळे प्रत्येकाने आपले वाहन मग ते दुचाकी असो चारचाकी वा त्यापेक्षा अधिक चाकांची वाहने असो, वेग हा मर्यादितच असावा, जो रस्त्यावर सर्वांना सुरक्षित ठेऊ शकेल.