Home राष्ट्रीय नीरव मोदीचा नवा पत्ता, कोठडी क्रमांक 12 आर्थर रोड जेल

नीरव मोदीचा नवा पत्ता, कोठडी क्रमांक 12 आर्थर रोड जेल

84

लंडन : भारतात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार करून विदेशात पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदीला भारताच्या स्वाधीन करायला अखेर ब्रिटनच्या न्यायालयाने परवानगी दिली आहे. न्यायालयाने नीरव मोदीच्या याचिकेवर सुनावणी करताना भारत सरकारच्या बाजून निर्णय घेत त्याच्या प्रत्यार्पणाला होकार दिला आहे. त्यामुळे मोदीची रवानगी आर्थर रोड जेलमध्येच होणार हे निश्चित झाले आहे.

भारतातल्या बँकांचं हजारो कोटींचं कर्ज बुडवून नीरव मोदी फरार झाला होता. त्याच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अनेक आर्थिक गुन्हे दाखल केले आहेत. आर्थिक गुन्ह्याचा आरोप असल्याने त्याची 329.66 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे.

दरम्यान, पंजाब नॅशनल बँकेचे 14 हजार कोटी रुपये बुडवून नीरज मोदी विदेशात पळून जात लंडनमध्ये होता. भारतीय तपास यंत्रणा त्याच्या मागावर आहे. अखेर भारताच्या प्रयत्नांना यश आले आहे.

प्रत्यार्पण केल्यानंतर नीरव मोदीची रवानगी मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात केली जाणार आहे. घोटाळा प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत त्याला आर्थर रोड तुरुंगात राहावे लागणार आहे. ब्रिटिश न्यायमूर्तींनी त्याबाबतही निर्णय दिला आहे. मुंबईच्या आर्थर रोड जेलमधील कोठडी क्रमांक 12 ही नीरव मोदीसाठी योग्य असल्याचा निर्वाळा ब्रिटिश न्यायमूर्तींनी दिला आहे.