Home राष्ट्रीय पश्चिम बंगालसह पाच राज्यात विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर

पश्चिम बंगालसह पाच राज्यात विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर

70

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केले. मुख्य निवडणूक आयुक्त [ election commission ]   सुनील अरोरा यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत या निवडणुकांची घोषणा केली.

आसाममधील निवडणूक तीन टप्प्यात, तर पश्चिम बंगालमध्ये तब्बल आठ टप्प्यांमध्ये होणार आहेत. तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात ६ एप्रिलला मतदान होईल. आसाममध्ये २७ मार्च, १ एप्रिल आणि ६ एप्रिल अशा तीन टप्प्यात मतदान होईल. पश्चिम बंगालमधे २७ मार्च तसंच ६, १०, १७, २२, २६ आणि २९ एप्रिल अशा आठ टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया राबवण्यात येईल. विशेष म्हणजे एकूण ८२४ मतदारसंघामधे १८ कोटी ६४ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

याशिवाय केरळमधील मल्लापूर आणि तामिळनाडूतील कन्याकुमारी या लोकसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक ६ एप्रिलला होणार आहे. या सर्व निवडणुकांसाठीची मतमोजणी २ मे रोजी होईल.

जागा अशा…
* पश्चिम बंगाल : २९४
* तामिळनाडू    : २३४
* केरळ          : १४०
* आसाम        : १२६
* पुदुच्चेरीमधे   : ३०