नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने सध्या लागू असलेले कोरोनासंबंधी मार्गदर्शतत्त्वांची मर्यादा 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासंबंधी आदेश जारी केला आहे.
मागील काही दिवसांत देशभरात पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. काही राज्यांमध्ये हा आजार झपाट्याने पसरतो असून, कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारी अधिकाºयांनी सांगितले.
यापूर्वी 27 जानेवारी 2021 रोजी नवे नियम लागू केले होते. कोरोना परिस्थितीवर लक्ष, कंटेनमेन्ट आणि खबरदारीबाबत आधी लागू असलेल्या नियमांचे 31 मार्चपर्यंत पालन करावे असे आदेश देण्यात आले आहेत.