Home राष्ट्रीय तीन महिन्यांत लागू होणार सोशल मीडियासंबंधी नवे नियम

तीन महिन्यांत लागू होणार सोशल मीडियासंबंधी नवे नियम

48

नवी दिल्ली : सोशल मीडियासाठीच्या नवे मार्गदर्शकतत्त्वे (गाईडलाईन्स) पुढील तीन महिन्यांत लागू करण्यात येणार असल्याचे सरकारच्या वतीने जाहीर केले आहे.

केंद्र सरकारकडून सोशल मीडियाच्या जवळपास सर्वच प्लॅटफॉर्म्ससाठी नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप यासारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईम, हॉटस्टार आदी ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा यात समावेश असणार आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद यांनी याबाबत माहिती दिली आहे.

नव्या नियमांनुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला कोणत्याही आक्षेपार्ह कंटेंटची समस्या असल्यास, त्याला 36 तासांच्या आत ती पोस्ट हटवावी लागेल. शिवाय डिजिटल मीडियाला इलेक्ट्रॉनिक मीडियाप्रमाणे स्वत: आचारसंहिता ठरवावी लागेल.

माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्यानुसार, भारतात सोशल मीडियाचा वापरकर्ते 140 कोटी आहे. हे नवे नियम युजर्सच्या संख्येच्या आधारे अधिक कडक होणार असून, भारतीय कायद्यांचे बंधनकारक असेल. कंटेंटसाठी सोशल मीडिया तक्रार अधिकारी नियुक्त करावा लागेल. त्यांना 24 तासांत तक्रार दाखल करून 15 दिवसांच्या आत समस्येचं निराकरण करावे लागेल. प्लॅटफॉर्म्सना भारतात आपल्या नोडल आॅफिसर, रेसिडेंट ग्रीवांस आॅफिसर तैनात करावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here