Home राजधानी मुंबई आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी आज परीक्षा ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या...

आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी आज परीक्षा ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या शुभेच्छा!

78

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागामधील रिक्त पदे भरण्यासाठी २८ फेब्रुवारी रोजी राज्यात परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना माझ्या शुभेच्छा, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

आरोग्य विभागातील विविध पदांसाठी ही परीक्षा होत असून परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येत आहे. केवळ गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार असून आपल्यातील गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन आरोग्य मंत्र्यांनी केले.

कोरोनाचे निदान झाल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करतानाच त्यांनी रुग्णालयातून पत्राद्वारे नागरिकांना मास्क वापरणे आणि कोरोना नियमांचे पालन करण्याबाबतचे भावनिक आवाहन केले होते.

राज्याच्या मुख्य सचिवपदी सीताराम कुंटे
राज्याच्या मुख्य सचिवपदी सीताराम कुंटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अतिरिक्त सचिवपदाची धुरा मनुकुमार श्रीवास्तव यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. सीताराम कुंटे 1985 च्या तुकडीचे सनदी (आयएएस) अधिकारी असून प्रशासनावर त्यांची मोठी पकड आहे.  महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव संजीव कुमार येत्या 28 तारखेला निवृत्त होत आहेत. त्यामुळे रिक्त झालेल्या मुख्य सचिवपदावर कुणाची वर्णी लागते याची चर्चा सध्या मंत्रालय आणि प्रशासनात होती.