Home मुंबई वनमंत्री संजय राठोड यांचा वनमंत्रिपदाचा राजीनामा

वनमंत्री संजय राठोड यांचा वनमंत्रिपदाचा राजीनामा

22

मुंबई : शिवसेनाचे संजय राठोड यांनी आपल्या वनमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी मुक्त आणि योग्य प्रकारे चौकशी व्हावी, म्हणून आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे, असे राठोड [ sanjay rathod ] यांनी पत्रकारांना सांगितले.

आपल्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी अनुचित होती. याप्रकरणी चौकशी पूर्ण होण्याआधीच आपल्यावर विरोधकांनी आरोप केले असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, राठोड यांनी पहिल्या दिवशीच राजीनामा द्यायला हवा होता. राठोड यांचा राजीनामा स्वीकारला आहे का किंवा स्वीकारला जाणार आहे का हे अजून स्पष्ट झालेले नाही, याप्रकरणी एफआयआर दाखल झाला पाहिजे, अशी मागणी आपण करणार असल्याचे विधानसभेतील विरोधीपत्रनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here