Home पूर्व विदर्भ वैनगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक

वैनगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक

87

मुंबई / भंडारा : वैनगंगा नदीचे [ vainganga river ] प्रदूषण रोखण्याबाबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे [ aaditya thakare ] यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली.
नागपूर, भंडारा, कामठी, कन्हान, मौदा, पवनी येथून निघणाºया प्रत्येक नाला, नदी यांचे मॅपिंग करून लहान नाले व ते मिळणाºया नद्या असे वर्गीकरण करून प्रत्येक ठिकाणाहून निघणाºया सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याबाबत रोडमॅप तयार करावा़ तसेच त्यासाठी लागणाºया निधीबाबत सविस्तर कृती आराखडा तयार करण्याबाबत मंत्री श्री. ठाकरे यांनी सूचना केल्या.

बैठकीस नगरविकासमंत्री श्री.एकनाथ शिंदे, ऊर्जामंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यासह नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे, नागपूर जिल्हाधिकारी रवींद्र्र ठाकरे, भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम, नागपूर महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.

कमी खर्चीक प्रकल्प जसे की, बायोरेमिडेशन, नाले अडवून त्या ठिकाणी प्रक्रिया याबाबत विचार करावा. नदी स्वच्छता रोड मॅप तयार करताना मध्यम व दीर्घ स्वरुपाचा कृती आराखडा तयार कषन सात दिवसांत सादर करावा. नाले सफाईबाबत एसओपी तयार करावी, अशा सूचनाही मंत्री श्री. ठाकरे यांनी सर्व संबंधित विभागांना केल्या. उपस्थित सर्व महापालिका, नगरपालिका यांना त्यांच्या क्षेत्रातून निघणाºयाघरगुती सांडपाण्याबाबत मॅपींग करत लघु, मध्यम व दीर्घ स्वरुपाचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

डॉ.राऊत म्हणाले, की तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्यात नागपूर शहरातून निघणाºया सर्व नाल्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे महानगरपालिकेने सुधारित कृती आराखडा तयार करावा. तसेच नालेसफाई करताना त्यातून निघणारा गाळ हा नदी, नाल्याकिनारी न टाकता त्याचे शास्रोक्त पद्धतीने योग्य ते व्यवस्थापन करावे़

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव श्री.शिनगारे यांनी वैनगंगा नदी प्रदूषणास कारणीभूत असणाºया घटकांची माहिती दिली. नागपूरमधून सांडपाणी घेऊन येणाºया नाग नदी, पिवळी नदी तसेच भंडारा, कामठी, कन्हान, मौदा येथील प्रक्रिया न केलेले सांडपाणी घेऊन येणारी कन्हान नदी यामुळे वैनगंगा नदीचे प्रदूषण होते, अशी माहिती देण्यात आली. नागपूर महापालिका आयुक्त यांनीही यासंदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.