परमेश्वराच्या अस्तित्वाचा अनुभव

रानशिवार

संत राजिन्दरसिंहजी महाराज

चला तर आपण एक प्रयोग करूया. एका दिवसात परमेश्वराची आपण किती आठवण काढतो, एक वेळा अथवा दोन वेळा? इतर वेळेस आपण परमेश्वराला का विसरतो? आणि याच गोष्टीचा विचार करितो की आपणच कर्ताकरविता आहे आणि आपल्या करण्यानेच हे होत आहे?

आपण परमेश्वराची आठवण करण्याच्या वेळामध्ये थोडी वाढ करायचा प्रयत्न करूया. आपण परमेश्वराला आपल्या बरोबर कामावर, आपल्या कुटुंबात, आपल्या मित्रांमध्ये आणि इतर दिनचर्या मध्ये घेऊन जातो का? आपण प्रत्येक क्षणी परमेश्वरा बरोबरच चालतो का? जेव्हा आपल्या जीवाला धोका असतो तेव्हाच आपण परमेश्वराची आठवण करतो. कधी जेवताना, कपडे घालताना, चालताना, चर्चा करताना, काम करताना, खेळताना अथवा झोपताना कधी परमेश्वराला बोलावितो का? पण असे करणारा प्रत्येक जण परमानंद आणि सदैव टिकून राहणारी खुशी प्राप्त करतो. जीवनातील उतार-चढावापासून भय रहात नाही.

ही आपल्या अंतरातील ईश्वरीय दैवी शक्ती आहे, जी आपल्याला आव्हानांशी सामना करण्याची शक्ती आणि साहस देते. प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या वेळी शारीरिक समस्यांशी सामना करावा लागतो. कधी कधी आपल्याला आश्चर्य वाटते काय आपण यातून बाहेर निघू शकू? पण जेव्हा आपण या समस्यांना यशस्वी रित्या सामोरे जातो तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटते की आपण हे कसे पार केले. यातील प्रत्येक अनुभव या ईश्वरी शक्तीचा परिणाम आहे, जी सदैव आपणाबरोबर असते. आपण कधीही एकटे नसतो. परमेश्वर सदैव आपल्याबरोबर असतो.

जेव्हा पण आपल्याला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागतो, जो आपल्याला अत्यंत कठीण वाटतो, तेव्हा आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण एकटे नाही. परमेश्वराचा अदृश्य हात सदैव आपल्या बरोबर आहे. आपण परमेश्वराला पाहू तर शकत नाही; पण परमेश्वराच्या शक्तीचा जरूर अनुभव घेऊ शकतो. बºयाच वेळा आपण देखील आपल्या अंतरी परमेश्वराच्या अदृश्य शक्तीचा अनुभव घेऊ शकतो. आपण जेवढे जास्त ग्रहणशील बनू, आत्मसात करू, तेवढे जास्त त्या शक्तीचा अनुभव करू शकू. त्याकरिता जेव्हा पण आपणाला संकटाशी सामना करावा लागतो, तेव्हा आपणाला त्या लोकांना आठवावे, ज्यांच्या समोर याहूनही मोठी संकटे उभी होती आणि ते सफलतापूर्वक यातून बाहेर पडले. जीवनातील आव्हानांचा सामना आपण निर्भिडपणे करावा. तसेच आपण पूर्ण प्रयत्नांची शर्थ करू या, पण परिणाम परमेश्वराच्या इच्छेवर सोडून द्यायला हवा. परमेश्वर सदैव आपल्या बरोबर आहे, जीवनातील प्रत्येक दु:ख; संकटात परमेश्वर प्रत्येकक्षणी आपले मार्गदर्शन करतो.

(लेखाचे सर्वाधिकार सुरक्षित)

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *