Home राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सागरी अर्थव्यवस्थेला चालना देण्यात भारत मोठे यश मिळवेल, पंतप्रधानांचा विश्वास

सागरी अर्थव्यवस्थेला चालना देण्यात भारत मोठे यश मिळवेल, पंतप्रधानांचा विश्वास

27

नवी दिल्ली : सागरी अर्थव्यवस्थेला चालना देण्यात भारताला मोठे यश मिळवेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी [ Prime Minister Modi ] यांनी व्यक्त केला आहे. ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे तीन दिवसीय ‘मेरी टाईम इंडिया समिट’चे उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

भारत सागरी क्षेत्रात आता स्वाभाविक नेतृत्वाच्या स्थितीत पोहोचला असून देशातल्या बंदरांना जोडण्याचे मोठे काम झालेले आहे, असेही ते म्हणाले. आपले सरकार देशात पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देत असून सागरी अर्थव्यवस्थेच्या विकासावरही भर देत आहे. जागतिक समुदायाने ही देशाच्या या विकासाचा भाग व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here