Home मुंबई पदांच्या निर्मितीबाबत समाज माध्यमांमध्ये प्रसारित झालेला २७ जानेवारी आणि १८ फेब्रुवारीचा शासन...

पदांच्या निर्मितीबाबत समाज माध्यमांमध्ये प्रसारित झालेला २७ जानेवारी आणि १८ फेब्रुवारीचा शासन निर्णय बनावट

23

मुंबई : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पुणे, नांदेड, नागपूर आणि चंद्रपूर येथे अतिविशेषोपचार रुग्णालय सुरु करण्यासाठी प्रथम टप्प्याकरिता आवश्यक ८८८ पदांच्या निर्मितीबाबतचा २७ जानेवारी २०२२ रोजीचा बनावट शासन निर्णय प्रसारित करण्यात आला आहे. आणि त्याआधारे आरोग्य सेवक पदाची अंतिम निवड यादी याबाबतचा १८ फेब्रुवारी २०२१ रोजीचा दुसरा बनावट शासन निर्णय प्रसारित करण्यात आला. समाज माध्यमांमध्ये प्रसारित होणारे हे दोन्ही शासन निर्णय बनावट असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

या बनावट शासन निर्णयात विभागाचे नाव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग दर्शविले असून शासन निर्णय क्रमांकात वैसेवा -१ कार्यासनाचा उल्लेख आढळतो. मात्र समाज माध्यमांमध्ये प्रसारित होणारा शासन निर्णय राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील वैसेवा-१ कार्यासनाकडून निर्गमित करण्यात आलेला नसल्याचे वैद्यकीय शिक्षण व ओषधी द्रव्ये विभागाने स्पष्ट केले आहे. या बनावट शासन निर्णयामुळे अनेक नोकरी इच्छुक उमेदवारांची फसवणूक होण्याची किंवा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे आज वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here