आकर्षक ‘वूडन ज्वेलरी’

ब्युटी अँड फॅशन वर्ल्ड

फर्निचरसाठी होणारा लाकडाचा वापर नवीन नाही. आता तर लाकडाचा वापर चक्क दागन्यांसाठीही होऊ लागला आहे. या लाकडी दागिन्यांना तरुण मुलींचीही चांगली पसंती मिळत आहे. लाकडांपासून बनवलेल्या बांगड्या, कानातील, नेकलेस या गोष्टींचा यात समावेश आहे. उन्हाळ्यात घामामुळे फारसे दागिने किंवा अ‍ॅक्सेसरिज वापरण्यास अडचण ोते़ अशा वेळेस वूडन ज्वेलरीचा पर्याय चांगला आहे. मोठे, चपटे, गोल, त्रिकोणी आकारातील नेकपीस, बांगड्या, रंगीबेरंगी आणि लांबलचक माळा, ब्रेसलेट, ईअररिंग्ज कोणत्याही शेड्सवर शोभून दिसतात. विविध रंगांच्या लाकडी बांगड्या हातभर घालणारी एखादी बाला भलताच भाव खावून जाते. हे दागिने साधे; पण छान वाटतात. कॉलेजपासून, समारंभातून, आॅफिसपर्यंत कुठेही शोभतात. लाकडाचे हे दागिने मॅट तसेच ग्लॉस प्रकारात उपलब्ध आहेत. तसेच, किंमतही परवडण्यासारखी असल्यामुळे दुधात साखरच! दागिन्यांशिवाय लाकडी बेल्ट्सनाही तरुणींची पसंती मिळत आहे. स्कर्ट, फ्राँक आणि जीन्सवरही हे बेल्ट वेगळा लूक देतात.

वजनाला हलके, कुठल्याही अ‍ॅलर्जीची भीती नसल्यामुळे या दागिन्यांना खास पसंती आहे. विशेषत: पारंपरिक कपड्यांवर ते शोभून दिसतात. निळ्या, पिवळ्या, काळ्या, हिरव्यासह वेगवेगळ्या रंगांच्या मिक्स कॉम्बनेशन्समध्येही उपलब्ध आहेत. अ‍ॅक्सेसरिजचा हा वेगळा प्रकार वापरताना चप्पल, बॅग आण कपड्यांच्या रंगाचा अंदाज घेऊन त्यााला साजेशा रंगाच्या ज्वेलरीची निवड करता येईल.

बांगड्या : लाकडी दागिन्यांवर वेगवेगळ्या रंगांचे पॉलिश करण्यात येते. विशेषत: त्यातील रंगीबेरंगी बांगड्या प्रथमदर्शनी काचेच्या असल्यासारख्या भासतात. लाकडी बांगड्यांचा हा पर्याय मस्त आणि ट्रेंडी आहे. पारंपरिक भारतीय नक्षीकाम आणि मण्यांची सजावट केलेल्या बांगड्यांचा सेट कुठल्याही कपड्यांवर उठून दिसतो. चौकोनी, षट्कोनी, अष्टकोनी अशा निरनिराळ्या आकार आणि डिझाईन्समधील बांगड्या कुठल्याही रंगाची साडी, कुर्ता किंवा अगदी आॅफिसवेअर कपड्यांवरही तितक्याच शोभून दिसतात. त्यामुळेच कॉलेज तरुणींबरोबरच इतर वयोगटातील स्त्रियाही वापर करताना दिसतात.

ब्रेसलेट आणि नेकलेस : लाकडाचा वापर करून बनवलेले ब्रेसलेट्सही बाजारात मोठ्या प्रमाणात विकले जातात. यासोबतच लाकडी नेकलेस घालण्यााचा ट्रेंडही कॉलेज तरुणींमध्ये दिसून येतो़ प्रामुख्याने हे नेक पीस कुर्ता किंवा साडीला आणखी क्लासिक लूक देतात. या विशेषत: एकरंगी लाकडी मणी तसेच लांबट चौकोनी किंवा लांबट गोलाकार, त्रिकोणी चकत्यांचा वापर केला जातो.
हे नेकलेस शक्यतो ब्राऊन किंवा काळसर रंगात असल्याने ते कोणत्याही रंगाच्य ा कपड्यांवर शोभून दिसतात. तसेच,टी शर्टवर लाकडी नेकलेसऐवजी चेनमध्ये एखाद्या रंगीत पेंडन्टचा वापर करू शकता.

(छायाचित्रे : प्रतिकात्मक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *