कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी महिनाअखेर नियमावली लागू करणार

राजधानी मुंबई

मुंबई : राज्यातील कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी ३१ मार्चपर्यंत प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) लागू करण्यात येईल. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार [ ajit dada pawar ]  यांनी विधानसभेत दिली.

औरंगाबाद शहरातीला कोविड सेंटरमध्ये डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. त्यावर उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, की ही घटना दुर्दैवी असून सरकारने त्याची गांभीर्याने दखल घेतली आहे. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी स्थानिक महिला वैद्यकीय अधिकाºयांमार्फत करण्यात आली आहे. प्रथमदर्शनी तथ्य आढळल्याने संबंधित डॉक्टरला बडतर्फ करण्यात आले आहे.

संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर केला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विनंतीनुसार राठोड यांच्या खात्याचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे देण्यास मंजुरी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *