Home राजधानी मुंबई भंडारा जिल्ह्यात पुरेशी धान खरेदी केंद्र सुरू : राज्यमंत्री विश्वजीत कदम

भंडारा जिल्ह्यात पुरेशी धान खरेदी केंद्र सुरू : राज्यमंत्री विश्वजीत कदम

58

मुंबई : भंडारा जिल्ह्यात 26 लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात पुरेशी म्हणजे 145 धान खरेदी केंद्रे कार्यरत आहेत. भंडारा जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यांमध्ये 205 राईस मिल धारकांची नियुक्ती करून त्यांचे करारनामे झाले आहेत.ज्या ठिकाणी गोदाम भरले आहे,अशा ठिकाणी स्थानिक पातळीवर उपलब्ध होणाऱ्या गोदामांमध्ये धानाची साठवणूक करण्यात येत आहे, कुठेही धान उघड्यावर पडलेले नाही अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी विधानपरिषदेत दिली.भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील धान खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत सदस्य डॉ.परिणय फुके यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

पवनी तालुक्यात पूर्वी 9 खरेदी केंद्र कार्यान्वित होती, परंतु आता या तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या मागणीप्रमाणे 23 धान खरेदी केंद्रांना नव्याने मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यापैकी 17 खरेदी केंद्रे कार्यरत आहेत, अशीही माहिती राज्यमंत्री श्री. कदम यांनी दिली. चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य जयंत पाटील आदींनी सहभाग घेतला