Home राष्ट्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवींवर साडेआठ टक्के व्याजदर देण्याची शिफारस

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवींवर साडेआठ टक्के व्याजदर देण्याची शिफारस

51

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (ईपीफओ) केंद्रीय मंडळाने सदस्यांच्या ठेवींवर २०२०-२१ वषार्साठी साडेआठ टक्के दराने व्याज देण्याची शिफारस केली आहे.

केंद्रीय विश्वस्त मंडळाची २२८ वी बैठक जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे पार पडली. कामगार राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांची मुख्यत्वे उपस्थिती होती.सरकारच्या राजपत्रात व्याजदर अधिकृतपणे सूचित केल्यानंतर ईपीएफओ सदस्यांच्या खात्यात व्याजदराची रक्कम जमा केली जाईल, असे गंगवार यांनी सांगितले.