Home अमृता...वूमेन वर्ल्ड उन्हाळ्यातील आरोग्यदायी फळे

उन्हाळ्यातील आरोग्यदायी फळे

63

सर्वसाधारणपणे माणसाच्या शरीराचे तापमान हे ३७ अंश सेल्सिअस असते. थोड्याफार प्रमाणात बदल होतो; पण शरीराच्या तापमानात अगदी १ अंश सेल्सिअसने सुद्धा चढ-उतार झाला तर विविध आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यासाठी शरीराचे तापमान स्थिर ठेवणे गरजेचे असते. मानवाचे शरीर स्वत:ला थंड करू शकत नाही. त्यामुळे काही वेळा आरोग्याच्या समस्या उद्भवतात. शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखण्यासाठी आरोग्यदायी फळांचे रस पिणे आवश्यक असते. पाणी आणि रसांचे सेवन करण्याबरोबरच शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काही थंड प्रकृतीचे पदार्थांचे सेवन केले पाहिजे.

कलिंगड : कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाणच सर्वाधिक असते, त्यामुळे शरीराच्या आतील उष्णता कमी करण्यासाठी कलिंगड उपयुक्त फळ आहे. नैसर्गिकरीत्याच पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहते आणि थंडपणाही राहतो.

खरबूज : उन्हाळ्यात मिळणारे खरबूज हे देखील पाण्याचे प्रमाण अधिक असलेले फळ आहे. त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. उन्हाळ्यात खरबूजही आहारात समाविष्ट करायला हवे.

काकडी : उन्हाळ्यातील आहार हा प्रामुख्याने पाणीयुक्त आणि शरीराला थंडावा देणारा असला पाहिजे. काकडी ही फळभाजी देखील पाण्याच्या प्रमाणामुळे पोटाला थंडावा देते. उन्हाळ्याच्या दिवसात रोज काकडीचे सेवन करण्यास काहीच हरकत नाही ती नैसर्गिकरीत्या उष्णता कमी करते.

दही : दही देखील शरीराला आतून थंडावा देण्यास मदत करते. दह्यापासून थंडगार मसालेदार ताकही बनवू शकतो. तसेच लस्सी, किंवा दह्यातील कोशिंबीर बनवू शकतो. तसेच फळांचे काप करून दह्यात घालून डेझर्ट म्हणून खाऊ शकतो.

मुळा : पाण्याचे प्रमाण अधिक नसले तरीही मुळ्यात ‘सी’ जीवनसत्त्वाचे प्रमाण खूप जास्त आहे, शिवाय अँटिआॅक्सिडंटस असल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते. मुळ्यात दाहविरोधी गुणधर्म असल्याने उष्णतेमुळे येणारा थकवा घालवण्यास उपयोगी पडते.

नारळपाणी : शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी नारळपाणी हा सर्वात उत्तम घरगुती उपाय आहे. त्यामुळे उष्णता कमी होतेच; परंतु उन्हाळ्यामुळे उद्भवणाºया शरीरातील पाणी कमी होणे म्हणजेच डिहायड्रेशन आणि उन्हाळ्यातील संसर्ग कमी होण्यास मदत होते.

कांदा : कांदा हा प्रकृतीनेच थंड आहे. त्यामुळे पदार्थ तयार करताना, रायते, कोशिंबिर, सलाड, चटणी यांच्यामध्ये कांद्याचा वापर करू शकतो. लाल कांद्यामध्ये अँटिअ‍ॅलर्जिक क्वेरसेटीनचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे कांद्याचा भरपूर वापर केल्यास सनस्ट्रोकविरोधात संरक्षण मिळेल.

(केवळ माहितीस्तव)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here