Home राजधानी मुंबई जवानांनी केलेल्या कारवाईत गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा शस्त्रास्त्र कारखाना उद‌्‌ध्वस्त

जवानांनी केलेल्या कारवाईत गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा शस्त्रास्त्र कारखाना उद‌्‌ध्वस्त

49

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या नक्षलवाद्यांचा शस्त्रांचा कारखाना 70 जवानांनी केलेल्या कारवाईत उद्ध्वस्त केल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख [ home minister Anil Deshmukh ]  यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.

निवेदन करताना गृहमंत्री श्री.देशमुख म्हणाले, आपल्या जवानांनी केलेली ही कामगिरी अभिमानास्पद असून 70 जवानांनी 48 तासाच्या या कारवाईत नक्षलवाद्यांच्या कोअर एरियामध्ये जावून शस्त्रास्त्रांचा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत एक जवान जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here