राज्याच्या आर्थिक विकास दरात आठ टक्के घसरण होण्याची शक्यता

राजधानी मुंबई

मुंबई : राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधिमंडळात सादर केला. त्यात २०२०-२१ च्या अंदाजानुसार राज्याच्या आर्थिक विकास दरात आठ टक्के घसरण होण्याची शक्यता आहे.

कृषी आणि संलग्न कार्यक्षेत्रात यंदा ११ पूर्णांक ७ दशांश टक्के वाढ अपेक्षित आहे. मात्र उद्योग क्षेत्रात ११ पूर्णांक ३ दशांश टक्के घट होण्याची तर सेवा क्षेत्रात ९ टक्के घट होण्याची शक्यता आहे.

२०२०-२१ चे दरडोई राज्य उत्पन्न १ लाख ८८ हजार ७८४ रुपये अपेक्षित आहे. देशांतर्गत स्थूल उत्पन्नात राज्याचा सरासरी हिस्सा सर्वाधिक १४ पूर्णांक २ दशांश टक्के आहे. जून ते आॅक्टोबर-२०२० या कालावधीत राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना एकूण ४ हजार ३७४ कोटी ४३ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली.

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ४ जानेवारी २०२१ पर्यंत राज्यातल्या १ कोटी २ लाख ५४ हजार शेतकºयांच्या बँक खात्यात एकूण ९ हजार ४९६ कोटी ३८ लाख रुपये जमा झाले, असं या अहवालात नमूद आहे. सन २०२० मध्ये आॅक्टोबरपर्यंत राज्यात ३७ हजार ८८७ कोटी रुपये प्रस्तावित गुंतवणुकीच्या २४७ प्रकल्पांची नोंदणी झाली.

सप्टेंबरपर्यंत राज्यात थेट परदेशी गुंतवणूक २७ हजार १४३ कोटी रुपये होती. एप्रिल २००० पासून राज्यातील थेट परदेशी गुंतवणूक ८ लाख १८ हजार ५२२ कोटी रुपये असून, हे प्रमाण देशातील एकूण गुंतवणुकीच्या २७ पूर्णांक ७ दशांश टक्के असल्याचे अहवालात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *