Home राजधानी मुंबई राज्यात दहावी, बारावीची परीक्षा आॅनलाईन नाही

राज्यात दहावी, बारावीची परीक्षा आॅनलाईन नाही

61

मुंबई : राज्यात इयत्ता दहावी तसंच बारावीची परीक्षा आॅफलाईन घेण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी विधानसभेत स्पष्ट केले.
या संदर्भात सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना शिक्षणमंत्री गायकवाड यांनी ही माहिती दिली. इयत्ता दहावीसाठी साधारणत: १६ लाख तर बारावीसाठी १५ लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.