Home राष्ट्रीय देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी स्थापित राष्ट्रीय समितीची पहिली बैठक सोमवारी

देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी स्थापित राष्ट्रीय समितीची पहिली बैठक सोमवारी

71

नवी दिल्ली : देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी स्थापन केलेल्या राष्ट्रीय समितीची पहिली बैठक उद्या, सोमवारी होणार आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सोहळ्याच्या तयारीच्या रुपरेषेबाबत या बैठकीत चर्चा होईल. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर हा कार्यक्रम कसा साजरा करावा, त्यानिमित्त कोणते कार्यक्रम आयोजित करावेत याचे धोरणात्मक दिशानिर्देश ही समिती निश्चित करणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या या समितीत २५९ सदस्य आहेत. त्यात केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल, भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, इतर पक्ष्यांचे प्रमुख, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, सरन्यायाधीश शरद बोबडे, नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन आणि कैलाश सत्यार्थी यांचाही समावेश आहे.